मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खुलं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असा संदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांसाठी दिला आहे.
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीमध्ये मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल, तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पाहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”
“सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत”
आम्ही पूरग्रस्त भागात डायरेक्ट फिल्डमध्ये होतो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”
“मुख्यमंत्री महोदय, आता तुमच्या काैशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार का?”