Home महत्वाच्या बातम्या “कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”

“कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना असलेला पुराचा धोका टळावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं  आहे.

सांगली, कोल्हापूरला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी अलमाटी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे. असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्विट करत केशव उपाध्ये यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत”

आम्ही पूरग्रस्त भागात डायरेक्ट फिल्डमध्ये होतो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

“मुख्यमंत्री महोदय, आता तुमच्या काैशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार का?”

“साताऱ्यातील पाटणमध्ये दरड कोसळून काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली, तर 3 जण बेपत्ता”