अहमदनगर : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
2019 साली जेव्हा महापूर आला तेव्हा 15 दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस डायरेक्ट फिल्डमध्ये होतो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर टीका केली जात होती. आता तुम्ही सत्तेत आहात. तात्काळ निर्णय घ्या आणि लोकांना मदत करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत. मंत्रालयातही नाहीत. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागलो आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री महोदय, आता तुमच्या काैशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार का?”
“साताऱ्यातील पाटणमध्ये दरड कोसळून काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली, तर 3 जण बेपत्ता”
“सांगलीकरांची चिंता वाढणार! कृष्णेची पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”
“देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”