Home महाराष्ट्र “सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या...

“सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे कृष्ण खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं., असं जयंत पाटलांनी जनतेला आवाहन केलं.

मला जाणीव आहे, आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथल्या प्रशासनालाही ताबडतोब हालचाली कराण्याचा सुचना दिल्या आहेत. धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत., असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

प्रशासन,लोकप्रतिनिधींच्या मी सातत्याने संपर्कात आहे.एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने असे अनेक संकट पाहिले आहे. आपण या संकटालाही तोंड देऊ असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आम्ही पूरग्रस्त भागात डायरेक्ट फिल्डमध्ये होतो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

“मुख्यमंत्री महोदय, आता तुमच्या काैशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार का?”

“साताऱ्यातील पाटणमध्ये दरड कोसळून काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली, तर 3 जण बेपत्ता”

“सांगलीकरांची चिंता वाढणार! कृष्णेची पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”