नवी दिल्लीः महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमकूळ घातला आहे. कोकण रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केंद्राकडून दिली जाईल. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 42 फुटांवर जाण्याची शक्यता
“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनंच न्यायालयात दिलं”
राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे