पुणे : मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरातील चारही धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच खडकवासला धरण 100 टक्के भरत आल्यामुळे आज पहिल्यांदा खडकवासला धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय.
दरम्यान, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणे 50 टक्के भरली आहेत. धरणक्षेत्रात झालेल्या पावसानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पावसाचा जोर असाच राहिला तर उद्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यात आहे.
VIDEO: पुणेकरांसाठी मोठी बातमी, खडकवासला 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं#Pune #Rain #KhadakwaslaDam pic.twitter.com/GjykRtZE81
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ✊ (@PravinSindhu) July 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 42 फुटांवर जाण्याची शक्यता
“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनंच न्यायालयात दिलं”
राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे
मला आता फोन कर, मी तुमच्यासाठी कपडे काढेन; अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा