सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. चांदोली धरण 86 टक्के भरलं आहे, तर चांदोलीतून 6000 क्युसेस विसर्ग सुरु आहे. आणि कोयना धरणातून 2100 क्युसेस विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
सांगलीती आयुर्वीन पुलाची पातळी रात्री उशीरा 32 फुटांपर्यंत पोहचली आहे. ती शुक्रवारी सकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फुटापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहरातील काही भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सांगलीमधील नदीकाठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनंच न्यायालयात दिलं”
राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे
मला आता फोन कर, मी तुमच्यासाठी कपडे काढेन; अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा
समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल