Home देश राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

नवी दिल्ली :  राज्यात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचंही नारायण राणेंनी म्हटलंय.

जवळपास 350 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढणं, अन्न पुरवठा करणं, त्यांना सुरक्षितस्थळी नेणं हे काम सरकारनं केलं पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंतर रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण अमित शाह यांच्याशीही बोलणार असल्याचं राणे म्हणाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली जात असताना नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासनही दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मला आता फोन कर, मी तुमच्यासाठी कपडे काढेन; अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“चिपळूणमध्ये पूर परिस्थिती आवाक्याबाहेर, सरकारने तातडीने लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज”

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल