Home पुणे समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे : लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारनं दिली पाहिजे,  असं म्हणत “करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपलं मत आहे. आपण ते आधीपासूनच अशी भूमिका घेतलेली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणं असे नियम पाळून काम सुरू केलं पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले, त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरं जावं लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का?”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी अभिष्टचिंतन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सुख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी”, अशा सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“चिपळूणमध्ये पूर परिस्थिती आवाक्याबाहेर, सरकारने तातडीने लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज”

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप