Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कैवारी आहेत”

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कैवारी आहेत”

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. भाजप नेते संजय काकडे यांनीही फेसबुक पोस्ट लिहित फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठ्यांचा कैवारी, देवेंद्र फडणवीस! 21 व्या शतकातील महाराष्ट्राचा विकासपुरुष म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे नाव सर्वांत आघाडीवर घेतले जाईल. चारित्र्य संपन्न व स्वच्छ प्रतिमा असलेल्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची मुहुर्तमेढ 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री म्हणून रोवली., असं संजय काकडे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु, एकानेही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाहीत. फडणवीस साहेबांनी मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. ते खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अफाट निर्णय क्षमता असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्णयक्षम व विकासाभिमुख सरकार काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले., असं संजय काकडेंनी म्हटलं.

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाच्या परिस्थितीचे अवलोकन करून माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे मराठा समाजात देखील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांची संख्या मोठी असून त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे सिद्ध झाले. आणि त्याच आधारे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने कायद्याचा आधार घेत फडणवीसांनी मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) कोट्यातून 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये दिले होते. जे उच्च न्यायालयाने अनुक्रमे 12 आणि 13 टक्के केले. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे फडणवीसांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आणि सर्वोच्च न्यायालयात हे मराठा आरक्षण टिकले नाही., असंही संजय काकडे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आणि शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत महाराष्ट्राची नवनिर्मिती आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात केला. जात, धर्म, पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन केलेल्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही. , असंही संजय काकडेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी भारताचा टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैना वादाच्या भोवऱ्यात”

“दिलेला शब्द जागणारे व कामातही ‘दादा’ असणारे अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची घेतली भेट; मुंडेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?