Home महाराष्ट्र सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात

सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाची भाषा केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं दिसत होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडली का? असे प्रश्न उपस्थित होत होते. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक म्हणतो, आम्ही स्वबळावर लढणार. दुसरा म्हणतो, त्यावर अग्रलेख लिहिणार, तर तिसरा म्हणतो, दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम राज्यात सुरू आहे, अशी जोरदार टीका शेलार यांनी सरकारवर यावेळी केली. तसेच राज्यात बाकी काही ऐकू येत नाही. फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते, असा टोलाही शेलार यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, राज्यासमोर मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पाऊस, पूर, कोरोना, लॉकडाऊन,शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी असे अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तिनही पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात असं चित्र राज्यात आहे, असा हल्लाबोल शेलार यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची घेतली भेट; मुंडेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

…मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा; भातखळकरांचा संजय राऊतांना खोचक सल्ला!

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”