Home महाराष्ट्र …म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे

…म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने प्रीतम मुंडेसह भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेतल्यानं अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या आहेत. यावर पंकजा मुंडेंनी भाष्य करत भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीसांनी आणि मी एकत्र काम केलं आहे. राजकीय पटलावर एकत्र काम केल्यानं ते माझे सहकारी आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस आहेत. राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे., असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

यवतमाळमध्ये भाजपला धक्का! भाजपचे ‘हे’ माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

“बाॅलिवूडमध्ये कुठल्याही लफडेबाज माणसाचा विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच”

पेगॅससचे खरे बाप देशातच, आधी त्यांना शोधा; सामनातून हल्लाबोल