यवतमाळ : भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची भेट घेऊन त्यांनी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्याचं समजतंय.
लवकरच आर्णी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तोडसाम राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. तोडसाम यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची आदिवासी नेतृत्वाची पोकळी भरली जाणार आहे.
राजू तोडसाम यांना वीज वितरणविरोधात आंदोलन करताना लेखपालाला मारहाण केल्या प्रकरणात तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला होता. त्यामुळे भाजपाने त्यांच्या जागी डॉ. संदीप धुर्वे यांना तिकीट दिलं होतं.
दरम्यान, पांढरकवडा सत्र न्यायालयानं राजू तोडसाम यांना ही शिक्षा सुनावली. त्यानंतर राजू तोडसाम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. तीन महिने कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली कारावासाची शिक्षा वरिष्ठ न्यायालयानंही कायम ठेवली होती. त्यामुळे राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. या घटनेनं ते चांगलेच चर्चेत आले होते.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”
“बाॅलिवूडमध्ये कुठल्याही लफडेबाज माणसाचा विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच”
पेगॅससचे खरे बाप देशातच, आधी त्यांना शोधा; सामनातून हल्लाबोल
आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल