कोलंबो : श्रीलंका विरुद्ध भारत संघात आज वनडे मालिकेतील दुसरा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 275 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 276 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग भारताने 49.1 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात पुर्ण करत विजय मिळवला.
भारताकडून सूर्यकुमारने 44 चेंडूत 6 चौकारांसह 53 धावा केल्या. तर दीपक चाहरने भुवनेश्वर कुमारसह काही आक्रमक फटके खेळत दमदार फलंदाजी केली. चाहरने 64 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला भुवनेश्वर कुमारने नाबाद 19 धावा करत चांगली साथ दिली. दीपक चाहर 82 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराहसह 69 धावांवर नाबाद राहिला. तो भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला.
दरमयान, श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कसून रजिथा, दसून शनका आणि लक्षण संदकनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य शिवसेनेत- अतुल भातखळकर
“महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”
“नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल”
मी ‘सामना’ वाचत नाही, उगाच सुर्यावर थूंकू नका; नाना पटोलेंचा घणाघात