मुंबई : राज्याची राजधानी मुंबईमध्ये पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून दरड कोसळल्याच्या अनेक घडताना दिसत आहेत. गेल्या 24 तासात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई तुंबली, मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात, ठाकरेंची तिसरी पीढी असफल, मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा, माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे, असं नवनीत राणे म्हणाल्या आहेत.
बीएमसी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. बीएमसीच्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी संसदीय समिती नेमण्यात यावी. बीएमसीकडून किती रुपये खर्च केला जातो हे जनतेला कळायला हवं. त्यामुळे मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करत आहे, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मुंबई तुंबली,मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात ,ठाकरेंची तिसरी पिढी असफल,मनपा चे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा,,माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास pic.twitter.com/SfKOvsyqgO
— Navneet Ravi Rana (@navneetravirana) July 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स; अमोल मिटकरींचा टोला, म्हणाले..
“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…”
“विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी, महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही”
सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस