मुंबई : सामना अग्रलेखातून राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था, त्यांच्या सुरक्षेविषयी घेतली जाणारी काळजी आणि दिवसेंदिवस होत चाललेला अतिरेक, यावर भाष्य करण्यात आलं होतं.
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा म्हणत कलियुग म्हणतात ते हेच का?, असा सवाल सामनातून केला होता. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय जी राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे संजयजी, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो
हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे संजयजी (२/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर आमचे नेते त्यांचा योग्य मानसन्मान करतील”
शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे…; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य
“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”
“भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो”