मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे
अमित शाह यांच्याकडे सहकार खातं गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार आहेत!” असं ट्वीट करत “सहकार खातं गेल्यानंतर हालचाली तर नक्कीच वाढणार आहेत. या हालचाली या भितीपोटी आहेत की आत्तापर्यंत एकाधिकार होता. राजेशाही होती. मनात जे आलं, ती कृती सत्तेचा उपयोग करून केली जायची. आता हा जनतेच्या अधिकारांचा अंकुश असणार आहे. आता तुम्हाला स्वैराचार करण्यास बंदी असणार आहे. पण शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट सहकार कायद्याच्या संदर्भात असेल असं वाटत नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, अनेकदा असं होतं की जेव्हा शरद पवार भेट घेतात, तेव्हा राजकीय चर्चा झाली असा आपल्याला भास होतो किंवा अशी चर्चा होते. मागची एक भेट डायमंड असोसिएशनच्या लोकांसाठी जागा मागण्यासाठी झाली होती. त्यांच्या प्रश्नांसंदर्भात झाली. पण माध्यमांमधून दुसरंच रूप दिलं जातं. अशा भेटींचा उद्देश राजकीयच असतो असं नाही. इतकी वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत. त्यामुळे अनेक संघटना सरकारपर्यंत प्रश्न पोहोचवण्यासाठी पवारांच्या नेतृत्वाचं माध्यम वापरत असाव्यात”, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
अमित जी शहांकडे सहकार खाते गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार आहेत..! @BJP4Maharashtra @MiLOKMAT @zee24taasnews @abpmajhatv pic.twitter.com/Rd4qvkJVlt
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) July 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”
“मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”
“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
“पंतप्रधान मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं यूपीमधलं अपयश लपत नाही”