मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं. मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल, असंही किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार
मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल @BJP4Maharashtra pic.twitter.com/DyEBMcm0tM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील
“ईडीची मोठी कारवाई! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त”
“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील”