Home महाराष्ट्र संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील

संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई : एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राठोड यांना क्लीन चीट देणं चिंताजनक आहे. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या., असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, संजय राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकुल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटतं, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ईडीची मोठी कारवाई! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त”

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठी गंभीर बाब; नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली काळजी

“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील”

“…तर महाराष्ट्राचं किती काैतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”