Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली स्वबळाचा नारा तसेच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंवर अग्रलेख लिहिला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे, असा टोला संजय राऊतांनी सामनातून चंद्रकांत पाटलांना यावेळी लगावला.

नाना पटोले हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना…. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो., असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन”

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

“अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही”

“शरद पवारांच्या भेटीनंतर आता निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या भेटीला”