पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं होतं. या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राणही गमावले. मात्र कोरोनाच्या या भयंकर काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या राज्याची गाडी ढासळू दिली नाही. यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचं काैतुक केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं आहे, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांचं काैतुक केलं. पुण्यात आज शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, शिवसेना सत्तेत आली आणि एक सुवर्णपान उलगडलं गेलं. कोणत्याही नेतृत्वासाठी, पक्षासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटन आणि नेतृत्व कसं आहे हे कळतं., असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी
सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत
“केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”
“ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”