Home महाराष्ट्र देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी

देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी

मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.

जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असं रामदास आठवले म्हणाले. काल रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहचण्यास मदतच मिळेल, असंही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

“केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”

“मोठी बातमी! पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण”