Home महाराष्ट्र सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

मुंबई : मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काही दिवसांपूर्वी पार पाडला. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अमित शहा यांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगलं करतील. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे. केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल. सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील, असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”

“मोठी बातमी! पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण”

मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे