Home महाराष्ट्र मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे

मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळालं असून त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शपथविधी पार पडल्यानंतर नारायण राणे यांना फोन केला होता.

मी नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचाही फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही; नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

“नाना पटोले स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागले होते, पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाच करून टाकला”

आमचं ठरलंय! विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांचं मोठं वक्तव्य