मुंबई : नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंना यावेळी लगावला होता. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आम्हांला काहीही म्हटलं तरी चालेल. पण आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी दिलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे, असा टोला नाना पटोलेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“नाना पटोले स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागले होते, पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाच करून टाकला”
आमचं ठरलंय! विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय- राज ठाकरे
प्रितम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे