मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदावरून वाद होताना दिसत आहेत. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. यानंतर अनेक तर्क वितर्क लावले गेले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय- राज ठाकरे
प्रितम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नाना पटोले महाराष्ट्रातील पप्पू आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला
…पण आज जगात आपला देश कुठे आहे?; भाई जगताप यांचा मोदी सरकारला टोला