पुणे : माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे हे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
प्रितम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नाना पटोले महाराष्ट्रातील पप्पू आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला
…पण आज जगात आपला देश कुठे आहे?; भाई जगताप यांचा मोदी सरकारला टोला
“रामदास आठवले साहेब, राष्ट्रपती व्हावेत ही माझी मनापासून इच्छा”