मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदावरून वाद होताना दिसत आहेत. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. यावर शिवसेना नेते व तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी तयार असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे., असं भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हटल.
महत्वाच्या घडामोडी –
मी काही मोठी नेता नाही, त्यामुळे भाजपला मला संपवायचं आहे, असं वाटत नाही- पंकजा मुंडे
“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”
“एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चाैकशी, ते ईडीला घाबरत नाहीत”
“पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”