मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे.
ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील, असं भाजपला वाटत असेल. परंतु तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”
“पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”
“संजय राऊतजी, महिलांची तुलना करताना भान ठेवा, अन्यथा आम्हांलाही आरेला कारे करण्याची भाषा येते”
“राफेल चौकशीची आग लागली फ्रान्समध्ये आणि धूर निघाला दिल्लीत, कुछ तो गडबड है…