Home महाराष्ट्र “पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”

“पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”

नागपूर : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल सायंकाळी पार पडला. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. यामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला.

राणेंनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं. राणेंनी आज सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

राणे यांचा पहिलाच दिवस असल्यामुळे अधिकारी वर्ग पूर्ण तयारी करुन आला नव्हता. बैठकीदरम्यान राणेंना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्टाफला बाहेर काढलं आणि अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. राणेंनी अधिकाऱ्यांसोबत जवळपास तासभर बैठक घेतली. त्यातील अर्धा तास तर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं.

दरम्यान, मी मंत्रालयात पदभार घ्यायला येणार आहे, हे माहीत असताना देखील तयारी का केली नाही, असा सवाल राणेंनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना केला.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊतजी, महिलांची तुलना करताना भान ठेवा, अन्यथा आम्हांलाही आरेला कारे करण्याची भाषा येते”

“राफेल चौकशीची आग लागली फ्रान्समध्ये आणि धूर निघाला दिल्लीत, कुछ तो गडबड है…

खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”