Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. तसंच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात मुळात त्यांना १२ आमदारांच शल्य बोचतंय, हा कबूली जबाबच नोंदवला..#MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर, नाभिक समाजातील गजानन कडू वाघ, कोविड योद्धा डॉ. गणेश शेळके यांना ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आपली जीवन यात्रा संपवावी लागली., असं पडळकरांनी म्हटलं.

याविषयी ठाकरे सरकारला काहीच देणंघेणं नाहीये. फक्त मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे. काल आपल्या पत्रकार मित्रांच्या प्रश्नांपासून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कसा पळ काढला.. याबाबत संजय राऊत आपण सामनात का बरळला नाहीत? की हा मुख्यमंत्र्यांनी पाडलेला लोकशाहीचा नवीन पायंडा तुम्हाला आवडलाय? असा सवाल पडळकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो; भास्कर जाधवांचा नितेश राणेंना टोला

“ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन”

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला”

“आणि हे वाघ म्हणे…अशा चिंधीचोरांना संरक्षण देणं, म्हणजे पोलिस दलाचा अपमान”