मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत भास्कर जाधवांवर टीका केली होती.
तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली होती. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन”
“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला”
“आणि हे वाघ म्हणे…अशा चिंधीचोरांना संरक्षण देणं, म्हणजे पोलिस दलाचा अपमान”
काल जे घडलं, ते लाजिरवाणं होतं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे