Home महाराष्ट्र “अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला”

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला”

मुंबई : कालपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष भाजपला 2017 साली केलेल्या 19 आमदारांच्या निलंबनाची आठवण करून देत टीका केली होती. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे १२-१९ च्या आकड्याचा खेळ वाटतोय यावरूनच कळते की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे?, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही हे विसरलात की जनतेच चिलखत आम्ही परिधान केलंय… माका तुका हा सांगुचा हा..अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय…लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आणि हे वाघ म्हणे…अशा चिंधीचोरांना संरक्षण देणं, म्हणजे पोलिस दलाचा अपमान”

काल जे घडलं, ते लाजिरवाणं होतं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार- चंद्रकांत पाटील

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा