Home महाराष्ट्र “आणि हे वाघ म्हणे…अशा चिंधीचोरांना संरक्षण देणं, म्हणजे पोलिस दलाचा अपमान”

“आणि हे वाघ म्हणे…अशा चिंधीचोरांना संरक्षण देणं, म्हणजे पोलिस दलाचा अपमान”

मुंबई : कालपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर भास्कर जाधव यांनी काल अध्यक्षांच्या सभागृहात झालेल्या गोंधळावर भाष्य केलं.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनी आणि आमदारांनी मला धमकी दिली. मी कोणालाही शिवी दिली नाही. एक साधा असंसदीय शब्द जरी मी वापरला असेल तर तुम्ही ते सिद्ध करा, सीसीटीव्ही फुटेज तपासा, तसे काही आढळले तर तुम्हाला होईल तीच शिक्षा मी स्वत:साठी घेईन, असं भास्कर जाधवांनी म्हटलं. त्यांच्या बोलण्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणावर आणि अध्यक्षांच्या भाषणावर भाष्य केलं.

फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून योग्य न्याय देण्यात येईल तर, तालिका अध्यक्षांना त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना संरक्षण देण्यात येईल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

आणि हे वाघ म्हणे… अशा चिंधीचोरांना संरक्षण देण म्हणजे पोलिस दलाचा अपमान आहे. ज्याला मुंगी मारणार नाही त्याला पोलीस संरक्षण देऊन जनतेच्या पैशाचा चुराडा का करत आहात?? भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो त्याला कोणीही मारणार नाही. आम्ही standard बघून मारतो. , असं जोरदार प्रत्युत्तर निलेश राणेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

काल जे घडलं, ते लाजिरवाणं होतं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार- चंद्रकांत पाटील

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा

“सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण”