मुंबई : आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला आणि भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली आणि कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आली, असं म्हणतच आमच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान, 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आज विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी सरकारच्या निषेधाच्या ठरावावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा
“सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण”
अजित पवार दाखवतात तिखट, पण कामात एकदम पोकळ माणुस; निलेश राणेंचा टोला
लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा; चित्रा वाघ कडाडल्या