मुंबई : राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत एक नवी मोठी घोषणा केली आहे.
31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मा.अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये. इथे आमचा होतकरू मित्र स्वप्नील लोणकरनं सरकारच्या नाकर्तेपणामुळं आपलं जीवन संपुष्टात आणलं आहे आणि त्याच्या आईने आपल्या संपूर्ण राजकारण्यांवर आपला तळतळाट व्यक्त केलाय. जरा तरी माणुसकीचे भान ठेवा आणि खरोखर आपण उर्वरीत MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न कधी मार्गी लावणार आहात? ते सांगा. असं म्हणत पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला.
तुम्ही सभागृहात सांगताय ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार आणि बाहेर येऊन (फेसबुक) सांगताय ३१ जुलै पर्यंत फक्त MPSC ‘सदस्यांच्या’ सर्व जागा भरणार… स्वप्नीलच्या आईला खरं उत्तर द्या…, असं गोपीचंद पडळकरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न कधी माॆॆॆॆॆॆॆर्गी लावणार आहात? ते सांगा. तुम्ही सभागृहात सांगताय ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार आणि बाहेर येऊन (फेसबुक) सांगताय ३१ जुलै पर्यंत फक्त MPSC ‘सदस्यांच्या’ सर्व जागा भरणार… स्वप्नीलच्या आईला खरं उत्तर द्या…
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण”
अजित पवार दाखवतात तिखट, पण कामात एकदम पोकळ माणुस; निलेश राणेंचा टोला
लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा; चित्रा वाघ कडाडल्या
शिवसेना-भाजपचं नातं आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखं- संजय राऊत