Home महाराष्ट्र शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात कोरोनामुळे 1 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाहीत. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे. हे राज्याचं अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे, असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”

“31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केलेली घोषणा फसवी”

गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी घोषणा