मुंबई : राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत एक नवी मोठी घोषणा केली आहे.
31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अजित पवार यांनी जी घोषणा केली 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदाची भरती करण्याची घोषणा केली आहे. ती भरती परिक्षा दिलेल्या उमेदवारांची नाही, तर संस्थेत रिक्त पदे भरणार आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तसेच एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त पदाची भरती करण्यासाठी मुदत कशाला लागते. ती पदे कधीही भरता येतात, असा आरोप करत फडणवीसांनी ही घोषणा फसवी असल्याचं म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक”