Home महाराष्ट्र गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

सत्ताधाऱ्यांनी भाजपवर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना घेरून धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर सभागृहाच्या बाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भास्कर जाधव जे काम करत होते. त्यांना जाऊन सगळ्यांनी घेरलं. त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि 15 मिनिटं शिवीगाळ करत होते. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी धक्काबुक्कीही केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेली नाही, असं नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं.

दुःख हे आहे की, हा सगळा प्रकार घडत असताना याचा पुढाकार या राज्याचे विरोधी पक्षनेते करत होते. त्यांच्या नेतृत्वात अध्यक्षांच्या दालनात ही सर्व घटना घडली असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

दरम्यान, त्याचबरोबर भाजपावाल्यांना गुंडगिरी करून विधानसभेचं कामकाज चालवायचं असेल, तर हे कधीही चालणार नाही. गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही, असंही नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

“प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीवर ईडीने कारवाई करावी, या कंपनीत 100 कोटींच्या वर अफरातफर”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक”

“इतका घाबरट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही”