Home महाराष्ट्र 31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी...

31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत एक नवी मोठी घोषणा केली आहे.

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करतंय… असा प्रश्न फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीवर ईडीने कारवाई करावी, या कंपनीत 100 कोटींच्या वर अफरातफर”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक”

“इतका घाबरट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही”

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली पत्रकार परिषद