मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीवर ईडीने कारवाई करावी, या कंपनीत 100 कोटींच्या वर पैशांचा अपहार आहे, अशी मागणी आजच्या शिवसेनचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने सरकारी पैशाचा केलेला अपहार 100 कोटींच्या वर आहे. ‘ईडी’ने तत्काळ त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सामनात करण्यात आली आहे. तसेच अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे या कंपनीच्या मालकांनाही समन्स पाठवावे, असे हे गंभीर प्रकरण आहे, असंही सामनात म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. पण सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या उद्योगांचाही भांडाफोड होण्याची गरज असल्याचं सामनात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक”
“इतका घाबरट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही”
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली पत्रकार परिषद
“फडणवीसांनी तेव्हा माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते”