मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुलीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं.
साहेब कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही…तुम्हीही लग्नाला या, असं आमंत्रण विठ्ठलराव गरूड यांनी दिलं.
बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र, शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी-
डोनाल्ड ट्रम्प जर मुंबईला आले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती- संजय राऊत
ठाकरे सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही- पंकजा मुंडे
ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; नारायण राणेंच भाकित
‘या’ दोन गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांच अभिनंदन