उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सक्षणा सलगर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता., असं सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे.
मला आज सायंकाळी 06:14 वा.
99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.@CMOMaharashtra @OsmanabadPolice @Jayant_R_Patil @supriya_sule @DGPMaharashtra— Sakshna Salgar (@SakshnaSalgar) July 3, 2021
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात 4 दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यावरुन पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, असं प्रत्युत्तर सक्षणा सलगर यांनी दिलं होतं. त्यानंतर “तुझी इज्जत लुटतो” अशी धमकी देणारा फोन सक्षणा सलगर यांना आला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“इतका घाबरट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही”
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली पत्रकार परिषद
“फडणवीसांनी तेव्हा माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते”
“हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे”