मुंबई : गेल्या काही वर्षांपासून महायुतीत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपची महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदावरून ताटातूट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
मी फडणवीसांना म्हटलं होतं की, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊन टाका, त्यांनी जर माझं तेव्हा ऐकलं असतं तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते” असं म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून फडणवीसांना सुनावलं आहे.
जर तुमच्या दोघांमध्ये एकमत होत नसेल, तर मला मुख्यमंत्री करा, असेही मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, रामदास आठवले यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटल्याचं यावेळी पाहायला मिळालं. रामदास आठवले यांच्या कवितांनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवला.
महत्वाच्या घडामोडी –
“हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे”
शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस
“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”
‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली