मुंबई : मराठा, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा तसेच इतर अनेक प्रश्नांवरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधणं टाळलं आहे.
प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेणं टाळलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर आता राज्यात अनेक चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतात. यावेळी पत्रकारंनी विचारलेल्या प्रश्नांचीही ते उत्तरं देतात. अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेण्याची प्रथा आहे. मात्र, याच प्रथेला फाटा देत ठाकरे यांनी पत्रकार परिषद टाळली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“फडणवीसांनी तेव्हा माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते”
“हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे”
शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस
“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”