Home महाराष्ट्र शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणात जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी असते त्यावर निर्णय होत असतो, असं सांगतानाच  शिवसेनेशी कोणतंही शत्रुत्व नाही, असं देवेंद्र फडणवीस ते म्हणाले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलत होते.

कोणाच्या भेटगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपची शिवसेना किंवा कुठल्याही पक्षाशी भेटगाठ नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून लढाई करण्याची आमची तयारी आहे,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”

‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रयत्नांना यश येतं”