बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रीपदावर बसवा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीड येथील कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं. ते परळीत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी सक्षमपणे कोर्टात लढणार असल्याचं धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं. तसंच विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
…तर भाजप विचार करेल; राऊत-शेलार भेटीवर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य
राऊत-शेलार यांची गुप्त भेट; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…
लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप?; शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण
5 वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत, हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं- पृथ्वीराज चव्हाण