मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेंव्हा भाजप विचार करेल, असं मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
राऊत-शेलार यांची गुप्त भेट; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…
लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप?; शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण
5 वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत, हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं- पृथ्वीराज चव्हाण
दिनो मोरिया BMC चा सचिन वाझे, सखोल चाैकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील- नितेश राणे