मुंबई : 5 वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगावं, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहे. मात्र, तरीही या संस्थांचा वापर केला जात आहे. सीबीआयकडे एक हजार खटले प्रलंबित आहेत. तसंच सत्ता गेल्यावरच भाजपला सर्व प्रकरणे आठवू लागतात, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी म्हटलं. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापलं की प्रकरणं बाहेर काढली जातात. पण ही प्रकरणं दाबली जातात की आणखी काय होतं ते कळत नाही. राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, असं म्हणत पाच वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं, असा टोमणा पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
दिनो मोरिया BMC चा सचिन वाझे, सखोल चाैकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील- नितेश राणे
इम्पिरिकल डेटा चा अर्थ काय हे उद्धव ठाकरेंनी एकदा सांगावं- निलेश राणे
“बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?”
“संभाजीराजे तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हांला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”