Home महाराष्ट्र दिनो मोरिया BMC चा सचिन वाझे, सखोल चाैकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर...

दिनो मोरिया BMC चा सचिन वाझे, सखोल चाैकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील- नितेश राणे

मुंबई : संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया यांचेही आर्थिक संबंध असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ईडीकडून इतक्या रकमेची संपत्ती जप्त केल्याचं समजतंय. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

इम्पिरिकल डेटा चा अर्थ काय हे उद्धव ठाकरेंनी एकदा सांगावं- निलेश राणे

“बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?”

“संभाजीराजे तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हांला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

“देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावेत”